माजी सभापती सी.दौ. सकपाळ यांचे निधन

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर पंचायत समितीचे सभापती व वारकरी सांप्रदायातील अध्वर्यू सीताराम दौलती सकपाळ यांचे शुक्रवार, दि. 26 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता 96व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. सी.दौ.सकपाळ यांच्या निधनाने पोलादपूर तालुक्यात सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. शनिवार, दि. 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कापडे बुद्रुक सकपाळवाडी येथे सी.दौ. सकपाळ यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सि.दौ. सकपाळ यांच्या पश्‍चात पत्नी, मुली कांता व शुभदा तसेच मुलगे रामदास आणि ज्ञानेश्‍वर तसेच नातवंडे-पंतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पोलादपूर तालुक्यातील आध्यात्मिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अपरिमित हानी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Exit mobile version