| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील डॉ. सिद्धेश मोकल या विद्यार्थ्याला बेळगाव-कर्नाटक येथील के. एल. ई. ॲकेडमी ऑफ एज्युकेशन ॲन्ड एज्युकेशन रिसर्च संस्थेच्या दंत विद्यालयात गुणवत्तेनुसार प्रवेश मिळाला होता. त्याने शिक्षण पुर्ण करून सुवर्णपदक मिळवून पदवी संपादन केली. त्यानंतर त्याच संस्थेत मास्टर ऑफ डेंटल सर्जन ही पदवीत्तर डिग्री मिळाली. हा पदवीदान समारंभ बेळगांव येथे गतवार्षिक पदवीदान केंद्रात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री जे.पी. नड्डा आणि संदिय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते डॉ. सिद्धार्थ मोकल याला पदवी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सिद्धार्थच्या यशाचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे. सिद्धार्थचे वडील ॲड. दत्तात्रय मोकल हे पनवेल व मुंबई येथील उच्च न्यायालयात सराव करीत आहेत. सिद्धार्थने मिळविलेले यश हे अलिबाग तालुक्यातील सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे बोलले जात आहे.