आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर स्पर्धेत सिद्धेश शिंदेचा सहावा क्रमांक

। उरण । वार्ताहर ।
बॉम्बे इकझीबीशन सेंटर गोरेगाव, मुंबई येथे अमेटर ऑलिम्पिया 2021 मेन्स फिजिक ग्रुपचे बॉडी बिल्डर स्पर्धा मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या टॉप 10 मध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यतील सिद्धेश शिंदे यांचा 6 वा क्रमांक आला. या कामगिरीमुळे सिद्धेश शिंदे याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तर विविध मान्यवरांनी सोशल मीडियाद्वारे सिद्धेश शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुन्हा एकदा सिद्धेश शिंदे यांच्या रूपाने उरणचे, रायगड जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहे.

Exit mobile version