| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद शाळा सिद्धेश्वर येथे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी (दि.7) सुधागड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्नेहसंमेलना दरम्यान विद्यार्थ्यांनी नृत्य, लावणी, पोवाडा, नाटिका, भारुड, गीत गायन असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमात सिद्धेश्वर आदिवासी वाडीतील शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे उत्कृष्ठ सादरीकरण केले. या कार्यक्रमांतून लेक शिकवा लेक वाचवा, आदिवासी विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबविणे, प्रदूषण, वृक्षारोपण या विषयांवर मोलाचे संदेश देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका खामकर, माधवी गुरव, रूपा पांपटवार, जनार्दन भिलारे तसेच, सिद्धेश्वर आदिवासी वाडी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण,बांदल, जागृती भोनकर यांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आशिका पवार, कैलास म्हात्रे, अविनाश कोनकर, संजय शिंदे, योगेश सुरावकर, रविंद्र यादव, सुनिल पोंगडे, अनिल राणे, मोरेश्वर कांबळे, सिद्धेश्वर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका मराठे, माजी मुख्याध्यापक आंबेकर, मंगेश यादव, सुधागड तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी, सर्व पालकवर्ग, महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वर सर्व सदस्य, शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.