साखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना साधेपणाने

शिवशाहीचा उत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
। कोर्लई । वार्ताहर ।
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणार्‍या मुरुड तालुक्यातील नांदगावच्या शिवशाही प्रतिष्ठान आयोजित साखरचौथ गणेश उत्सव मित्र मंडळातर्फे बाजारपेठेतील साखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना साधेपणाने करण्यात आली. यंदाच्या पूजेचा मान दिनेश शाहपूरकर यांना मिळाला.

नांदगावमधील शिवशाही प्रतिष्ठान साखरचौथ गणेश उत्सव मित्र मंडळाच्या वतीने सन 2013 पासून साखर चौथ गणपती बसविला जात असून, यंदाचे नववे वर्ष आहे. शुक्रवार, दि.24 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. श्रींची विधीवत प्राणप्रतिष्ठापना, आरती करण्यात आली. यानिमित्ताने सायंकाळी 7.00 वा.संगीत भजनाचा कार्यक्रम व रात्रौ 12 वा. महाआरती घेण्यात आली. यावेळी भक्त गण उपस्थित होते. शनिवार, दि.25 सप्टेंबर रोजी सकाळी विधीवत पूजाअर्चा आरती व सायंकाळी 5 वा. श्रींची गावातून साधेपणाने मिरवणूक काढण्यात येणार असून, विसर्जन सोहळा होणार आहे.

शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुदेश घुमकर असून, मंडळ कार्यकारी अध्यक्ष योगेश जयस्वाल, उपाध्यक्ष सुदेश भणगे, सचिव महेश कोतवाल हे आहेत.

Exit mobile version