। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील मजगावच्या शिवप्रेमी शिवभक्त मित्र मंडळ आयोजित पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणपती बाप्पा सजावट आरास स्पर्धेत मजगावच्या हर्षद चोगले यांच्या पुरातन दगडी मंदिर या देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या आरास स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी (दि.21) सप्तरंगी मित्र मंडळ मजगाव यांच्या साखरचौथ गणपती बाप्पा उत्सव मंडपात पार पडला. स्पर्धेतील द्वितीय क्रमांक तन्वी म्हाप्रळकर- कोकणी पद्धतीतील मंदिराच्या दर्शनी भागातील अप्रतिम दिप सजावट, तर तृतिय क्रमांक कुणाल गाणार यांच्या करवीर महालक्ष्मी मंदिराला मिळाला. तसेच, या स्पर्धेत उत्तेजनार्थ चिराग तेलगे, मिथुन भोईर, अनुज तांबडकर, वेदांत तळेकर, विनित घरत, सनिकेत बुल्लु, श्रावणी चौलकर, गणेश शेडगे, ओमकार गायकर, ॠतिक चोरढेकर, संदेश भोईर, निनाद तळेकर, श्रवण गिरणेकर व विराज घाटकर यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी शिवभक्त मित्र मंडळाचे अध्यक्ष नाथा गिरणेकर, समिर माळी, यश एकशिंगे, योगेश घरत, शनिकेत भोईर, राज पाटील, दिपेश पाटील, नितेश कांबळे, निशांत गुंड व सप्तरंगी मित्र मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.