| बीड | प्रतिनिधी |
केज येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्याप्रकरणाच्या तपासात एसआयटीला महत्त्वाचे यश मिळाले आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि हल्ल्यासाठी वापरलेला चाकू आरोपीच्या शेतातून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात जप्त करण्यात आलेले हे पुरावे तपासासाठी महत्त्वाचे मानले जात असून, त्याआधारे आरोपींविरुद्धचे पुरावे अधिक भक्कम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे हत्येच्या तपासाला अधिक वेग मिळणार असल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.







