सिताराम सितापराव यांचे निधन

। पाली । वार्ताहर ।

कासारवाडी येथील रहिवासी उद्योजक सिताराम सखाराम सितापराव यांचे मंगळवारी (दि.23) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 72 वर्षाचे होते. त्यांचे पश्‍चात पत्नी तीन मुलं, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शून्यातून विश्‍व निर्माण करणारे उद्योजक सिताराम सितापराव यांच्या अचानक जाण्याने नागोठणे शहरासह कासारवाडी गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी नागोठणे पंचक्रोशीसह तालुक्यातून त्यांचे सगेसोयरे मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे दशक्रिया विधी गुरुवारी (दि.2) उद्धर येथे होणार असून उत्तरकार्य रविवारी (दि.5) नागोठणे येथील राहते घरी होतील.

Exit mobile version