सहा बालके निरीक्षण गृहात दाखल

। नेरळ । प्रतिनिधी ।

बाल कल्याण समिती रायगड यांच्या आदेशाने जिल्हा परिवीक्षा संघटना संचालित सहा बालकांचे कर्जत येथील निरीक्षण गृहात काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधीत मुलांची नावे सोनू मनोज कांबळे (13), विजय रामु सिंग (09), राज सुरेश वाघमारे (12), सोनू विजय (13), लक्ष्मण संतोष पवार (15), महेश लक्ष्मण (14) अशी असून तीस (30) दिवसांच्या आत या 6 बालकांच्या पालक व नातेवाईकांनी कर्जत येथील जिल्हा परिवीक्षा संघटना संचालित मुलांचे निरीक्षण गृह/बालगृह (410201, 9970122623) किंवा अलिबाग येथील जिल्हा महिला व बालविकास विभाग (7775018197) यांच्याशी संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा बालकांची जबाबदारी घेण्यास कोणीही नाही असे समजून बाल कल्याण समितीच्या मार्फत बालकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल.

Exit mobile version