। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
पिशोर ते कन्नड मार्गावरील खाडी चंदन नाल्याजवळ सोमवारी (दि.10) पहाटे ट्रक उलटल्याने त्यातील उसाच्या मोळ्यांखाली दबून सहा तरुण कामगारांचा मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले आहेत.
ऊसतोड कामगार हे वाकत येथून रसवंतीसाठी ऊस घेऊन येत होते. ट्रक पूर्ण भरून झाल्यानंतर वाहनाने गावाकडे यायची तयार करत होते. मात्र, वाहन न मिळाल्याने उसाने भरलेल्या ट्रकवरच बसून ते पिशोरकडूनन कन्नडकडे येत होते. याच मार्गावरील घाटात चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. या अपघातात सहा तरुण कामगारांचा मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले आहेत.
किसन धर्मु राठोड (30), मनोज नामदेव चव्हाण (23), कृष्णा मुलचंद राठोड (30), मिथुन चव्हाण (26), विनोद नामदेव चव्हाण (28) व ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण (36) अशी मृतांची नावे आहेत. तर, इंदरचंद प्रेमसिंग चव्हाण, रवींद्र नामदेव चव्हाण, राणी लखन राठोड, लखन छगन राठोडे, सागर भागीनाथ राठोड, राहुल नामदेव चव्हाण, सचिन भागीनाथ राठोडे, आरती ज्ञानेश्वर चव्हाण, मारू भिका चव्हाण, नामदेव भिका चव्हाण व अनिता नामदेव चव्हाण, अशी जखमींची नावे आहेत.