| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा पोलिसांकडून जिल्ह्यातील पोलीस नाईक यांच्या पोलीस हवालदार म्हणून बढत्या करण्यात आल्या आहेत. त्यात कर्जत तालुक्यातील सहा पोलीस कर्मचारी हे पोलीस हवालदार बनले आहेत.
दरवर्षी पोलीस कर्मचारी यांच्या बढत्या त्यांच्या कार्यकाळानुसार होत असतात. पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक आणि नंतर पोलीस हवालदार अशी पोलीस बढती मिळत असते. पोलीस हवालदार पुढे सहायक पोलीस उपनिरीक्षक बनतो आणि त्यांना पुढे पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत बढती मिळत असते. रायगड पोलीस दलाकडून करण्यात येणार्या खातेनिहाय बढतीमध्ये कर्जत तालुक्यातील सहा पोलीस नाईक पोलीस हवालदार बनले आहेत. त्यात कर्जत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक समीर भोईर, अशोक ओंकार राठोड तसेच नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शरद कृष्णा फरांदे, निलेश वाणी आणि महिला पोलीस नाईक लतिका प्रवीण कदम आणि माथेरान पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक प्रमोद मारुती पाटील अशा सहा पोलीस नाईक यांना बढती मिळाली असून, ते पोलीस हवालदार बनले आहेत. रायगड जिल्ह्यात 30 पोलीस नाईक पोलीस हवालदार बनले असून, त्यात कर्जत तालुक्यातील सहा पोलीस नाईक आता पोलीस हवालदार असतील.
कर्जत पोलीस ठाण्यातील बढती मिळलेले पोलीस हवालदार समीर भोईर यांना गार्ड लावताना कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे सोबत सहायक पोलीस निरीक्षक सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मांडे उपस्थित होते.







