मुलांकरिता आकाशकंदील प्रशिक्षण शिबीर!

पेण | वार्ताहर |
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा,आनंदाचा उत्सव. दिवाळी साजरी करताना घरासमोर आकाश दिवा आणि दिवाळीचा फराळ हा हवाच. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचे भान असणे तितकेच महत्त्वाचे. दिवाळीकरिता पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविणे हे शिबिर घेण्यामागे उद्देश आहे .मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही विद्यार्थी वर्गाला या शिबिराची उत्सुकता आहे .हे ध्यानात घेऊनच विनोबा जन्मस्थान गागोदे आणि मूलभूत अधिकार संघर्ष समितीने  आकाशकंदील मेकिंग वर्कशॉप मआयोजित केला आहे.
प्लास्टिकचा वापर टाळून इकोफ्रेंडली आकाश दिवा  बनवून दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा अशी माहिती सामाजिक कार्यकर्ती मोहिनी गोरे यांनी दिली आहे.महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष अण्णा वनगे यांनी  विद्यार्थीवर्गाला या म आनंद पर्वणीत म  सहभाग घेता यावा  याकरिता उत्साहाने वाचनालय हॉल मध्ये परवानगी दिली आहे .शिबिर महात्मा गांधी वाचनालय पेण येथे 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 12.30 या वेळेत होणार आहे. गतवर्षी आपण शिबिरात चांदणी बनवली होती तीही अगदी मोठी ,छान सुबक प्रत्येकाला आपल्या घरासमोर लावता आली अशीच .यावर्षी असणार आहे षटकोनी आकाराचा आकाश दिवा .शिबिराची फी नाममात्र 150 रुपये आहे .शिबिरात आकाश दिवा बनवण्याची साहित्य व खाऊ दिला जाणार आहे. शिबिरार्थींनी 9420393841 या नंबर वर संपर्क करावा .शिबिराची नाव नोंदणी 23 ऑक्टोबर पर्यंत करणे आवश्यक आहे.

Exit mobile version