सागाच्या झाडांची कत्तल

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

। पाली/वाघोशी । वार्ताहर ।

विविध वनसंपदेने नटलेल्या सुधागड तालुक्यात वृक्ष कत्तलीला उधाणच आले आहे. वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे मौल्यवान समजल्या जाणार्‍या साग प्रजातींची डेरेदार झाडे अवैध वृक्षतोड करणार्‍यांकडून भुईसपाट केली जात आहेत. या झाडांची तोड करुन अवैधरित्या साठवणूकप्रकरणी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला आहे.

सुधागड तालुका हा वनीकरणाने विखुरला आहे. मोठ्या प्रमाणात जंगल भाग आहे. यामध्ये सागाच्या झाडांची अवैधरित्या तोड करून साठवणूक करण्यात आली आहे. तालुक्यातील पेडली सर्वे नंबर 6/2/2, भालगुल येथील फार्म हाऊस, भारजेवाडी येथील सर्वे नंबर 438 व 312 या ठिकाणीसागांचे झाडांची वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात साठा आढळून आल्याचे सामाजिक कार्यकर्ते सागर मिसळ यांनी सांगितले. याबाबतीत त्यांनी रीतसर अर्ज वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड यांच्याकडे केला आहे. सुधागडात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व सागाच्या झाडांचे अफरातफर होत असल्याचे निदर्शनास येऊनही वनपरिक्षेत्र अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. दरम्यान, सागर मिसाळ यांनी कुठलीही कायदेशीर करू नये याकरिता त्यांना अनेक अनोळखी कॉल येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, वृक्षतोड करणार्‍यांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

Exit mobile version