सरकत्या जिन्याची प्रतिक्षा कायम

। नेरळ । प्रतिनिधी ।

मध्य रेल्वेवरील भिवपुरी रेल्वे स्थानकात सरकता जिना मंजूर होऊन बरेच दिवस झाले आहेत. परंतु, त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे भिवपुरी रेल्वे स्थानकातील सरकता जिना प्रवाशांसाठी केव्हा उपलब्ध होईल, अशी विचारणा कर्जत येथील पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. यावेळी रेल्वे प्रशासनाने हा सरकता जिना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

सध्या भिवपुरी रेल्वे स्थानकात दोन लिफ्टचे काम सुरू आहे व ते आता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. याबाबतीत आपण वेळोवेळी रेल्वे प्रशासनाची पत्र व्यवहार करीत आहोत. परंतु, भिवपुरी रेल्वे स्थानकात सरकता जिन्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्या कारणाने भिवपुरी प्रवासी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत. या बाबतीत भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी ओसवाल यांच्याशी संपर्क करून या बाबतीत आपण पाठपुरावा करावा, अशी विनंती केली होती. या बाबतीत ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाची पत्र व्यवहार केला असता रेल्वे प्रशासनाने भिवपुरी रेल्वे स्थानकातील सरकता जिना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध होईल, असे कळविले आहे.

Exit mobile version