चिमुकल्या हातांनी साकारला किल्ला

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील प्राथमिक शाळा तळवली तर्फे घोसाळे या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या चिमुकल्या हातांनी विविध प्रकारचे गड-किल्ले बनवून सार्‍यांचे लक्ष वेधूनघेतले आहे. या शाळेचे मुख्याध्यापक सचिन खेंकरे यांच्या संकल्पनेतून दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर गड-किल्ले बनविणे या उपक्रमातंर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी वर्गानेही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या चिमुकल्या हातांनी अतिशय सुंदररित्या गड-किल्ले साकारले. तर तांबडी केंद्राचे केंद्रप्रमुख विवेकानंद पोटे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रूपेश चव्हाण यांनी येथे भेट दिली व गड-किल्ल्यांचे परीक्षण करून मुलांच्या सुप्त कलागुणांचे विशेष शब्दात कौतुक केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच मुलांना पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Exit mobile version