सर्पमित्र संदीप घरत ने दिले ६ फुटी नागाला जीवदान

। मुरूड । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील नांदगाव वाघेश्वर नगर येथे स्वामीक चौलकर यांच्या घरात घुसलेल्या ६ फुटी नागाचे प्राण मालकाच्या सतर्कतेमुळे वाचले. सर्पमित्र संदीप घरत यांना संपर्क करुन नागाला दिले जिवदान त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. नागेश्वर नगर येथे स्वामीक चौलकर यांच्या घरात भला मोठा ६ फुटी नाग घुसून दडून बसला होता. हि बाब घरमालकाच्या लक्षात आली. तेव्हा आजुबाजुच्या लोकांनी एकच गर्दी केली होती. इतक्या मोठ्या नागाला काही लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु घरमालकाने विरोध करत अथक प्रयत्नाने सर्पमित्र संदीप घरत यांचा नंबर मिळवून त्यांना संपर्क करुन बोलावून घेतले. सर्प मित्र संदिप घरत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मोठ्या शिताफीने ६ फुटी नागाला जेरबंद केले. त्यानंतर वनखात्याच्या सहाय्याने या नागाला जंगलात जाऊन सोडून दिले. जर अशा प्रकारे कोणतेही सर्प आढळून आल्यास नजिकच्या वनखात्याशी संपर्क साधावा या मुक्या प्राण्यांना मारु नये असे आवाहन सर्प मित्र संदिप घरतने केले आहे.

Exit mobile version