सर्पमित्र संदीप घरतने दिले नागाला जीवदान

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड रस्त्यावर राजवाड्याजवळ असलेल्या तांडेल यांच्या हॉटेलमध्ये शिरलेल्या सहा फुटी नागाला सर्पमित्र संदीप घरत यांनी आपल्या कौशल्याने पकडून जीवदान दिले. यावेळी वनविभागाचे वनपाल संतोष रेवणे किरण गायकर, मनीष विरकुड, दिनेश रोटकर यांच्या सहकार्यही त्यांना लाभले. याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

राजवाड्यानजीक तांडेल यांच्या हॉटेलमध्ये सर्प आल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनपाल संतोष रेवणे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तात्काळ सर्पमित्र संदीप यांच्याशी संपर्क साधला. संदीप घरत यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आपल्या कौशल्याने सहा फुटी नागाला पकडून जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून जीवदान दिले.

Exit mobile version