| पनवेल | वार्ताहर |
शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या विवाहितेचे 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी खेचल्याची घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे. याबाबत खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अनिता यादवर (41) या पतीसोबत शतपावली करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्यांच्या समोरुन मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्याने यादवर यांच्या गळ्यातील 4 तोळे वजनाचे मंगळसूत्र खेचून पलायन केले.