। उरण । प्रतिनिधी ।
पाचवी महाराष्ट्र राज्यस्तरीय मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धा 14 आणि 15 डिसेंबर रोजी नाशिक येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर यांनी 35 वर्षेवरील वयोगट मधील 800 मीटर आणि 1500 मीटर धावणे या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तर, 5 किलोमिटर धावणे या क्रिडाप्रकारात रौप्यपदक प्राप्त केले आहे.
याचबरोबर स्नेहल पालकर यांचे सहकारी अमित विचारे यांनी 40 वर्षांवरील वयोगट मधील 1500 मीटर धावणे या क्रीडाप्रकारामधे सुवर्णपदक तर 800 मीटर धावणे आणि 5 किमी धावणे यामध्ये रौप्यपदक प्राप्त केले. तसेच, 50 वर्षांवरील वयोगटात 800 मीटर आणि 1500 मीटरमध्ये रौप्यपदक प्राप्त केले आहे. तर, अमोल वळसंग यांनी 35 वर्षेवरील वयोगटात 1500 मीटर आणि 10 किमीमध्ये रौप्यपदक तर 5 किमीमध्ये कांस्यपदक प्राप्त केले आहे. तसेच, मनीष खवले यांनी 55 वर्ष वरील गटामध्ये उंचउडीत सुवर्णपदक तर लांबउडीत कांस्यपदक प्राप्त केले आहे.
या सर्व खेळाडूंची निवड मार्च महिन्यात ओरिसा येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरामधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच, त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.