जेष्ठ नागरिक संघातर्फे स्नेहमेळावा

। अलिबाग । वार्ताहर ।
रेवदंडा येथिल ज्येष्ठ नागरिक संघाला 21 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या संघामार्फत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलाकारांनी गीतगायन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
या कार्यक्रमाला वरसोलकर मॅडम, श्री व सौ.चिटणीस, देवधर यांच्यासह आदी ज्येष्ठ मान्यवरांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी चित्रलेखा पाटील यांच्याकडून पुरस्कृत एक संगीत पर्वणी आयोजित करण्यात आली होती. या संगीत पर्वणीमध्ये जय शारदे, एकाच जन्मी जळू, संत भार पंढरीचा, पाहिले न मी तुला, झिणी झिणी वाजे बीन, दिवस तुझे हे फुलायचे, कानडा राजा पंढरीचा, सूर तेच छेडीता, शोधिसी मानवा आदी मराठी गीते सादर करण्यात आली. यावेळी आशुतोष पोटे, प्रतीक नाईक, शार्दूल भगत यांनी वादन केले तर विक्रांत वार्डे, विशाल माळी, रसिका कार्लेकर, मीरा, चंद्रकांत झावरे, यांनी गीत गायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण निवेदन प्रतिम सुतार यांनी केले. या दिलेल्या संगीत पर्वणीनिमित्त मा.चित्रलेखा पाटील यांचे सर्व उपस्थितांनी आभार मानले.

Exit mobile version