शोभाताई म्हात्रे यांचे निधन

| अलिबाग | प्रतिनिधी |
धाकटे शहापूर,ता.अलिबाग येथील सेवानिवृत्त शिक्षिका सौ.अचला ऊर्फ शोभाताई जनार्दन म्हात्रे,(वय 74) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात सेवानिवृत्त शिक्षक पती जनार्दन दत्तात्रेय म्हात्रे, चार मुले, चार सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहापूर परिसरात त्या शोभाताईं म्हणुन सर्वश्रूत होत्या. सामाजिक कार्य तसेच शैक्षणिक कार्यात त्यांचा समावेश असे. प्रेरणा महिला मंडळ, बचत गट, नाच मंडळ यांच्या त्या बरीच वर्षे अध्यक्ष तसेच नवरात्र मंडळाच्या उपाध्यक्ष होत्या. त्यांच दहावे येत्या रविवारी 23 ऑक्टोबरा हरिहरेश्‍वर येथे तर तेरावे गुरुवारी दि. 27 ऑक्टोबर) रहात्या घरी होणार आहे.

Exit mobile version