वैजनाथ केंद्रशाळेत सामाजिक उपक्रम

। माथेरान । प्रतिनिधी ।

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनस्वी गृप संस्था, वैजनाथ केंद्रशाळा आणि वैजनाथ ग्रामपंचायत माध्यमातून आदिवासी महिलांचे व्यक्तिमत्व विकासास ज्ञान प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांना साडी आणि शिधा वाटप करण्यात आला. कार्यक्रमास शेकडो आदिवासी महिला सहभागी झाल्या होत्या.

जि. प. सदस्या आशा झिपुर यांनी महिलांना साहित्य वाटप केले. संतोष सावंत यांनी या कार्यक्रमाबद्दल केंद्र शाळा वैजनाथचे आभार मानले. अमिता तावडे यांनी प्रबोधन केले. सुजित धावडे, माधव पाठक, मंगेश साळखे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमात सविता बोराडे, नारायण सोनवणे, बाळासाहेब ढाकणे, अशोक पाखरे, अनंत थोरवे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

Exit mobile version