जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे सामाजिक उपक्रम

| पनवेल | वार्ताहर |

जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्यावतीने यावर्षी श्रीक्षेत्र पंचायत मंदिर नढाळ चौक येथे नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या उत्सवात संस्थेच्या माध्यमातून पनवेल परिसरातील महिलांसाठी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि दिपक क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्तविद्यमाने महिलांसाठी मोफत थायरॉईड टेस्टचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांनी दिली.

सदर योजना दि.15 ते 23 या नऊ दिवसात सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था सेवालय, दिपक क्लिनिकल लॅबोरेटरी, शॉप नंबर 4 , वास्तु श्री सोसायटी, आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयासमोर पनवेल येथे आयोजित केले आहे. यावेळी तपासणी करणाऱ्या सर्व महिलांना जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून एक सेवाकार्ड भेट म्हणून देण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी 50 टक्के टक्यांपर्यंत सवलतीच्या दरात रक्ततपासणी, उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल निराधार गरजू रुग्णांना मोफत फळ सेवा, एक्स-रे, श्रम कार्ड नोंदणी, विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन तसेच ना नफा ना तोटा या तत्त्वावर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सेवेचा लाभ महिला आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य घेऊ शकणार असल्याची माहिती दिली म्हात्रे यांनी दिली. अधिक माहितीसाठी मिळविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक: 8542050505, 9326050505, 7769050505 यावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आम्ही महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने नऊ दिवस हा आरोग्य उत्सव साजरा केला जातो. माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य उत्सवाचे नियोजन आम्ही करीत असतो. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या त्यांच्या शिकवणीमुळे आमच्या संस्थेचे सर्व सभासद नेहमीच आरोग्य, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात.

प्रीतम जनार्दन म्हात्रे, अध्यक्ष, जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था
Exit mobile version