रक्तदानातून सांभाळली सामाजिक बांधिलकी

| तळा | वार्ताहर |

श्री संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 674 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून श्री देव राधाकृष्ण नामदेव शिंपी समाज तळे या संस्थेमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान हे श्रेष्ठ दान. मनुष्याला जगण्यासाठी रक्ताची नितांत गरज असते. रक्तदानामधून आपण अनेक प्राण वाचवू शकतो. आज शासकीय, निमशासकीय रक्तपेढीतून रक्ताचा तुटवडा जाणू लागला आहे. अनेक हॉस्पिटलमधून रक्तपेढीत देखील रक्तपुरवठा कमी पडताना दिसत आहे. अश्यावेळी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून गेली 8 ते 9 वर्षे श्री देव राधाकृष्ण नामदेव शिंपी समाज संस्थेतर्फे श्री संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. यावेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये महिलांनी देखील रक्तदान केले आहे. खरोखरीच रक्तदान करणारे धन्य आहेत.

यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य यांचे माध्यमातून डॉ. दीपक गोसावी, वैभव कांबळे, गणेश भोईर, सुशांत भगत, अभिषेक घरत, मंगेश पिंगळा, महेश घाडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version