| तळे | वार्ताहर |
तळे येथील श्री देव राधाकृष्ण नामदेव शिंपी समाज यांच्या श्री राधाकृष्ण मंदिरात 673 वा संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदी व भक्तीमय वातावरणात पार पडला. सकाळी श्रीची पूजा सालकरी व्यवस्थापक पवन रोहिदास रोडे यांचे हस्ते करण्यात आली. यानंतर ह भ.प.महेंद्र बुवा कजबजे यांचे साथीदारांसह काकड आरती कार्यक्रम पार पडला. टाळ, मृदंगाच्या निनादात मधुर वाणीने पांडुरंगाचे नामस्मरण गोड अभंगाद्वारे सारा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. शासकीय रक्तपेढी अलिबागच्या माध्यमातून युवक मंडळांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी 42 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेला सहकार्य केले. यावेळी सतीश रामचंद्र मुद्राळे यांनी महाप्रसाद दिला असून 450 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर सायंकाळी विद्यार्थी गुणगौरव सोहळा, सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक आणि विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर महिलांचे कार्यक्रम, त्यानंतर रात्रौ भजन व शेजारतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महिला मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश दलाल, रवींद्र वाईकर, सतीश मुद्राळे, प्रमोद मेकडे, पुरुषोत्तम मुळे, महेंद्र कजबजे, प्रकाश मेकडे, नमित पांढरकामे, श्रीराम कजबजे, सर्व कार्यकारिणी सदस्य, युवक मंडळ अध्यक्ष विनित पाडळकर, सचिव श्रेयस रोडे, उपाध्यक्ष निशांत मुद्राळे, सर्व सदस्य, महिला मंडळ अध्यक्ष जानकी कजबजे, उपाध्यक्ष पूजा मेकडे, सचिव स्मिता मुद्राळे, सर्व समाज बांधव भगिनी युवक मंडळ यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराचे नियोजन आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यकारी सदस्य मितेश मुळे यांनी उत्तम प्रकारे केले.