| नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात बुधवार (14) घनकचरा व्यवस्थापना बाबत ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण करणे बाबत कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत इको सत्व संस्थेचे राहुल निकम तसेच त्यांचे सहकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन करुन घनकचरा व्यवस्थापनास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी नागोठणे ग्रामपंचायत सरपंच डॉ मिलिंद धात्रक, रंजना राऊत, माधवी महाडिक, रोहा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. एन. गायकवाड, नागोठणे ग्रामविकास अधिकारी, मोहन दिवकर, कीर्तीकुमार कळस,सुदर्शन कोटकर, शबाना मुल्ला,श्रेया कुंटे, प्रियांका पिंपळे आदींसह नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील महिला ग्राम संघ तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.