महिला आघाडी सेवा संस्थेची मागणी
| माथेरान । वार्ताहर ।
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने माथेरानमध्ये तीन महिन्यांच्या प्रयोगीग तत्वावर ई-रिक्षा नगरपालिकेकडून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांसह येथे येणार्या पर्यटकांची आवाजाही सुरू आहे. त्यामुळे रिक्षामध्ये पर्यटकांना प्रवेश देऊ नये अशी मागणी माथेरान महिला आघाडी सेवा संस्था यांनी मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे लेखी स्वरूपात केली आहे.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा रुपाली शिंगाडे, अनुक्षा बिरामणे,लता ढेबे, रेखा ढेबे, संगीता ढेबे, कमल ढेबे, भागीरथी ढेबे उपस्थित होत्या. या निवेदनात असे नमूद केले आहे की ई-रिक्षा मध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जात आह,े त्यामुळे माथेरान मधील सर्व अश्वचालक,हमाल तसेच इंदिरा गांधी नगर भागातील लॉज धारक व स्टॉल धारक या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे येणार्या पर्यटकांना ई-रिक्षा मध्ये प्रवास करू न देता माथेरानमधील शाळेतील विद्यार्थी, ज्येेष्ठ नागरिक, दिव्यांग यांनाच प्राधान्य देण्यात यावे त्यामुळे हमाल,लॉज धारक, स्टॉल धारक आणि अश्वचालक यांना रोजगार उपलब्ध होईल. आमच्या या मागणीचा विचार न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा ही या निवेदनात देण्यात आला आहे.