। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे वसाहतीमधील विविध नागरी समस्या संदर्भात परिमंडळ -2 चे पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांची शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. कामोठे शिवसेना शहर प्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र-13 चे उप विभाग प्रमुख सचिन त्रिमुखे व विभाग प्रमुख बबन गोगावले यांनी परिमंडळ -2 चे पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांची भेट घेऊन विविध नागरी समस्यांचा पाढा त्यांच्या समोर वाचला त्यामध्ये प्रामुख्याने कामोठे शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा बंद अवस्थेत आहेत त्याचे योग्य ते निरीक्षण करून चालू करण्यात यावे, कामोठे शहरातील गस्त वाढवावे, कामोठे येथे विस्टा कॉर्नर सेक्टर -19 येथे पोलीस अधिकारी दिवस उन्हात आणि पावसाळ्यात उभे राहून ड्युटी करतात त्यासाठी चौकी उभी करावी, कामोठे महामार्ग शिवसेना शाखा सेक्टर- 6 येथे पोलीस अधिकारी दिवस उन्हात आणि पावसाळ्यात उभे राहून ड्युटी करतात त्यासाठी चौकी उभी करावी आदी मागणीसाठी त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2 शिवराज पाटील यांनी तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर ह्या योजना पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले.