| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात टेबल टेनिसपटू सोनल पटेलला पराभवाचा सामना करावा लागला. चायनाच्या ली कियानने सोनलचा 11-9, 3-11, 17-15, 7-11, 4-11 अशा सेटमध्ये 2-3 ने पराभव केला. वर्ग 3 श्रेणीमध्ये, खेळाडूंवर ट्रंकचे नियंत्रण नसते, तरीही त्यांचे हात कमीत कमी दुर्बलतेमुळे प्रभावित होतात. वर्ग 4 श्रेणीमध्ये अ गटात भविना पटेल यांनी टेबल टेनिस स्पर्धेत भारतचे प्रतिनिधित्व केला. भविनाचा सामना चायनाच्या झो यिंग विरुद्ध झाला. झो हिने 3-11, 9-11, 2-11 ने सरळ सेट जिंकत भविनाला पराभूत केले. या सामन्यात भविनाला झो विरुद्ध एकही सेट जिंकता आला नाही. पॅरालीम्पिक स्पर्धेत भारताची सुरुवात जरी पराभवाने झाली, तरी स्पर्धेतील पुढील सामन्यात भारताच्या पदरात पदकाची भर पडेल, अशी आशा आहे.