। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अश्विनी टिचर्स क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागधील ग्रामीण भागातील शाळांमधून इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेल्या व अश्विन टिचर्स क्लासेस मधील इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विशेष गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी अलिबाग मधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाला.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन राऊळ, रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक सुभेकर, रायगड प्रेस क्लब चे अध्यक्ष भारत रांजणकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर, हरी देशमुख, लायन्स क्लब चे माजी अध्यक्ष अभिजित पाटील, अश्विनी टिचर्स क्लासेस च्या संचालिका अश्विनी मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष समीर मालोदे, रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन चे खजिनदार जितेंद्र मेहता आदि मान्यवर उपस्थित होते.
इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेल्या
पी.एन.पी. शाळेतील मराठी माध्यमातुन निरज मिसाळ, इंग्रजी माध्यमातील सिया अग्रवाल, आय.ई.एस. वरसोली शाळेतील सईद सिद्दीकी, भावर्थ घरत, नागांव हायस्कुलमधील प्रचिती राऊळ, खंडाळे हायस्कुलमधील भावेश माळी, सु.ए.सो. कुरूळ शाळेतील अफरिन सिद्दिकी, चोंढी स.म.वडके विद्यालय चोंढीची दिव्या म्हात्रे, बामणगांव हायस्कुलमधील रिया शिपाई, रूतिका राऊत, स. रा. तेंडुलकर विद्यालय रेवदंडा येथील रिया शिवरकर, भाव्या जैन, जा. र. ह. कन्याशाळेतील वेदश्री वनारसे, अरूणकुमार वैद्य हायस्कुलमधील ओजस पाटील, दिव्या संपलेषा, बेलोशी हायस्कुलमधील वेदांती थळे, सुमित मालोदे,अनुज शिगवण, अथर्व म्हात्रे, अभिजित सावंत याचबरोबर अश्विनी टिचर्स क्लासेस मधील युग जैन, जिया जैन, जश नागडा, रिषभ जैन, मानस शहा, यांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आले. कोरोना काळात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल दिव्या खडपे, प्रज्ञा माळी आणि समिक्षा घरत यांना कोविड योध्दा म्हणून गौरविण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे नेहमीच विविध उपक्रम राबविले जात आहे. शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उत्तूंग यशाला वाव मिळत आहे. अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या या उपक्रमाचे सर्व पालक व विद्यार्थ्यांकडून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे सचिव अमोल नाईक यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष तुषार थळे, सचिव अमोल नाईक, खजिनदार राकेश दर्पे, कार्याध्यक्ष सचिन म्हात्रे, ज्येष्ठ छायाचित्रकार सुरेश खडपे, विवेक पाटील, सुबोध घरत, विकास पाटील, अतुल वर्तक, सुदेश माळी, संदेश कवळे, योगेश सावंत, असोसिएशनचे सदस्य, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.