। रोहा । प्रतिनिधी ।
ईपीएस-95 पेन्शनरांच्या विविध मागण्यांबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती, रोहा यांच्या वतीने 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली पेन्शन वाढ व अन्य मागण्यांसाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भातील पुढील रणनीती तसेच अद्ययावत माहिती पेन्शनर सभासदांना या मेळाव्यात देण्यात येणार आहे. रोहा तालुका तसेच शेजारील तालुक्यांतील सर्व ईपीएस-95 पेन्शनर्सना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.मेळाव्यास पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, महाराष्ट्र राज्य संघटक अजित घाडगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इंद्रजीत राजपूत, पुणे जिल्हा समन्वयक दिलीप कहाणे, नवी मुंबई अध्यक्ष विनायक तेंडुलकर, पांडू पाबरेकर, सचिव देवराम कर्णेकर व खजिनदार नंदकुमार भादेकर हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पेन्शनधारकांसाठी रोहा येथे विशेष मेळावा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606