रोहन गोसावीचा विशेष सन्मान

। खांब । वार्ताहर ।

दहाविच्या परीक्षेत आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन केलेल्या रोहन विनायक गोसावी याचे ग्रामस्थ मंडळ नाथपंथीय गोसावी समाज धानकान्हे यांच्यावतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

आपल्यातील जिद्द चिकाटी व आत्मविश्‍वास यांच्या जोरावर रोहन याने हे सुयश संपादित केले आहे.प्राथमिक शाळेपासून ते हायस्कूल शिक्षणापर्यंत एक अष्टपैलू विद्यार्थी म्हणून रोहन याची विशेष ओळख आहे.रोहनचे वडील ग्रा.पं.कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहेत. तर, आई गृहिणी आहे. प्रतिकूल परिस्थितीत रोहनने हे यश संपादन करून आपल्याला भावी आयुष्यात डॉक्टर बनण्याचे स्वप्न असल्याचे त्यानी सांगितले. तर, ग्रामस्थ मंडळ व समाजाकडून त्याचा विशेष सन्मान करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी धोंडू कचरे, पांडुरंग गोसावी, दत्ता हळदे, जनार्दन गोसावी, ज्ञानेश्‍वर तुपकर, विनायक गोसावी व विशाखा गोसावी आदी उपस्थित होते.

Exit mobile version