| अलिबाग । प्रतिनिधी ।
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जे.एस.एम. कॉलेज अलिबाग येथे दोन दिवसीय विशेष नवमतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन प्रा. अनिल पाटील यांच्या हस्ते दि. 11 ऑगस्ट रोजी करण्यात आले.
दरम्यान, शिबिरास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा. पाटील म्हणाले, नवीन नियमानुसार वर्षातून चार वेळा, 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी नवमतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन केले. या कार्यक्रमास जे.एस.एम. कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. पी. बी. गायकवाड, आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या प्रमुख प्रा. गौरी लोणकर, निवडणूक साक्षरता अभियान प्रमुख प्रा. सुनील ठोकळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पात्र विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या हस्ते अर्ज क्रमांक 6 देण्यात आले. 12 ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे.