• Login
Saturday, September 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अबोल प्रीत बहरली…

Krushival by Krushival
February 14, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
0
SHARES
183
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उमेश-निवेदिताच्या ‘मुक्या संवादा’ची बोलकी कहाणी
| राकेश लोहार | चौल |
मनातील प्रेमरुपी भावनांना व्यक्त करण्याचे मुख्य माध्यम म्हणजे संवाद. मुळात, प्रेमाचा उगमच संवादातून होतो, हेही तितकेचे खरं. परंतु, संवादाशिवाय स्पर्श अन् हावभावही प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम बनू शकते, आणि त्यातूनही ‘अबोल प्रीत’ बहरास येते, याचे सुंदर उदाहरण उमेश आणि निवेदिता हे दाम्पत्य. त्यांची ‘लव्हस्टोरी’सुद्धा समाजापुढे एक आदर्श म्हणून पाहता येईल. आजच्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने त्यांचा हा प्रेमरुपी प्रवास…

अलिबाग तालुक्यातील भायमळा येथील अनंत पाटील यांचे पत्नी, दोन मुले आणि मुलगी असे छोटे आणि सुंदर कुटुंब. याच कुटुंबात उमेशचा जन्म झाला. म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याचप्रमाणे उमेश लहानपणापासूनच चलाख, दिसायलाही गोरागोमटा होता. त्यामुळे सर्वांचाच लाडका. आईवडिलांनाही मुलाचे कौतुक होते. परंतु, आपल्या मुलाचे ‘बोबडे बोल’ त्यांच्या नशिबात नव्हते. जन्मताच मूक (अबोल) असल्याने तो ‘आई’ किंवा ‘बाबा’ बोलू शकला नाही. परंतु, याबाबत कोणतेही दुःख न बाळगता आईवडिलांनी उमेशला चांगले शिक्षण देऊन घडविण्याचे ठरविले. कारण, शिक्षण हे कोणत्याची संकटावर म्हणा किंवा व्यंगावर मात करण्याचे प्रमुख अस्त्र आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत, की ज्यांनी शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्याचा मार्ग सुकर केला आहे. शिक्षणाचे महत्त्व त्यावेळी उमेशच्या आईवडिलांनी जाणले, आणि त्याचे भविष्य घडविण्याचे ठरविले.

सुरुवातीस नागाव आणि त्यानंतर अलिबाग येथील मूकबधीर शाळेत उमेशने चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आजकाल प्रेमाची सुरुवात शालेय जीवनातच होते. मनानेच काढलेल्या चित्रांत रंग भरायला सुरुवात होते आणि हळूहळू आकर्षण वाढू लागतं. त्याची परिणती प्रेमात होते. या गोष्टीस उमेशही अपवाद नाही. कारण, उमेश ज्या शाळेत शिकत होता, त्याच शाळेत निवेदिता (पूर्वाश्रमीची निवेदिता चंद्रकांत पाटील, रा. पळी) हीदेखील शिकत होती. तेव्हापासून त्यांची ओळख. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. संवादाविनाही त्यांची ‘अबोल प्रीत’ फुलली, बहरली ती फक्त नि फक्त नजरेच्या इशार्‍यातून आणि हावाभावातून.

लग्नाच्या रेशीमगाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात असे म्हणतात, ते उमेश आणि निवेदिता यांच्याबाबतीतही खरे म्हणावे लागेल. कारण, चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी होते. उमेश वडिलांच्या व्यवसायात त्यांना मदत करीत असे, तर निवेदिता आईला घरकामात हातभार लावे. पण, मन मात्र दोघांचे एकमेकांत गुंतले होते. दोघांनाही एकमेकांसोबत संसार करायचा होता. आयुष्यभर एकत्र राहायचे होते. दोघांच्या मनातील प्रेम जाणले होते ते त्यांच्या वडिलांनी. योगायोगाने उमेशचे वडील अनंत पाटील आणि निवेदिताचे वडील चंद्रकांत पाटील वर्गमित्र. पेझारीच्या नाना पाटील विद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनीच दोघांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला आणि लग्न निर्विघ्नपणे पार पडले.

सुरुवातीला घरच्यांनाही दोघांच्यातील इशार्‍यावर बोलण्याची वेगळीच गम्मत वाटायची आणि त्यामुळे तितक्याच वेळा एकमेकांच्या चेहर्‍यावर हसूदेखील पाहायला मिळायचे. शब्दात बोलण्यापेक्षा हावभावातून सुरु असलेला ‘मुका संवाद’ त्यांना आनंद देत असे. यातूनच एकमेकांना काय हवंय नको कळायला लागलं आणि दोघांचा जिव्हाळा वाढत गेला. तिच्या स्वप्नातील राजकुमार आणि त्याच्या स्वप्नातील परी ही प्रत्यक्षात अवतरल्यामुळे त्यांना स्वर्गही ठेंगणा वाटू लागला आणि दोघेही गुणगुणू लागले…
शब्द झाले मुके, बोलती पैंजणे
उतरले गाली या, सोवरी चांदणे
पाहताना तुला चंद्र ही लाजला
ओळखू लागलो…
तू मला… मी तुला…

अशा अबोल संवादातून त्यांचे प्रेम निर्माण झाले. बहरत गेले. एकमेकांना जुळवून घेण्याची तयारी असेल तर कोणतीही भाषा आड येत नाही, हे उमेश आणि निवेदिता यांच्याकडे पाहून लक्षात येते. उमेश अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये परिचर म्हणून काम करीत असून, संपूर्ण संसाराचा गाडा हाकण्यास मदत करीत आहे. आज या दोघांना दिव्या आणि दीक्षा अशा सुंदर जुळ्या मुली असून, त्या अलिबाग येथील केइएस नंदा देशमुख ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिक्षण घेत आहेत. त्यांनी पेझारीच्या नाना पाटील हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, एकीने 94 तर दुसरीने 93 टक्के गुण मिळविले आहेत. 
तुझ्या माझ्या नात्याला
गरज नाही शब्दांची
न बोलताही होते
देवाण-घेवाण भावनांची

खरंच आहे हे… शब्दरुपी संवाद या दोघांमध्ये नसला तरी स्पर्श अन् हावभाव यांनी मने जुळली आणि संसार सुखाचा झाला. व्यक्त होताना प्रेमाच्या वाटा वेगळ्या असल्या तरी, प्रेमाची भाषा एकच असते, हेच यावरुन सिद्ध होते. 14 फेब्रुवारी 2005 रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. आज उमेश आणि निवेदिता यांच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या सुखी संसाराला मनःपूर्वक शुभेच्छा…

Related

Tags: #valentin day special #valentine #valentine day #love #love stories #marathi news #marathi news raigad #online marathi news
Previous Post

दिवस प्रेमाचा, मानव जातीचा!

Next Post

तु ही रे माझा मितवा…

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

SKP News: महागाईचा मार, त्यावर करांचा भार

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मत्स्यसाठ्याचे होणार शास्त्रीय मूल्यमापन

September 19, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
sliderhome

पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक

September 19, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू
sliderhome

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू

September 19, 2026
Next Post

तु ही रे माझा मितवा…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?