| पोलादपूर | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर लोहारमाळ गावाजवळ मुंबईकडून पोलादपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याची घटना बुधवारी (दि.09) रात्री घडली आहे. या अपघातात दुचाकीवरून निघालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी टेम्पो चालक अतुल कातवणकर (35), ता. देवगड जि. सिधुदुर्ग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास गणेश महादेव येरुणकर, (41), रा.पोलादपूर यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार येरुणकर यांचा भाचा सुनिल सुरेश पवार हा दुचाकीवरुन पत्नी व दोन मुलांसह लोहारमाळ ते पोलादपुर मुबई गोवा हायवेने पोलादपूर दिशेला जात होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने धडक दिली. या अपघात सुनिल पवार त्याची पत्नी सुवर्णा पवार (39), मुलगा श्लोक पवार (13) आणि रिया पवार (10) सर्व रा. ताबंडभुवन पोलादपूर, जखमी झाले. त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, सुनील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सुनीता व दोन मुले गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई येथील एम जी एम ला हलविण्यात आले.