। रोहा | वार्ताहर ।
माणगाव येथील रुग्णाला पनवेल येथे पुढील उपचारासाठी घेऊन जाताना अति वेगाने आलेल्या एसटी बसने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील ताणसई गावाच्या हद्दीत घडली. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. किडनी विकाराने त्रस्त असलेल्या कुणाल बाईत यांच्यावर माणगाव येथे उपचार सुरू होते. पुढील उपचारांकरिता त्यांना म्हसळा येथून 108 रुग्णवाहिकेतून सोमवारी (दि.11) पनवेलकडे रवाना झाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील खांब ते नागोठणेदरम्यान ताणसई गावाच्या हद्दीत भरधाव वेगाने आलेल्या एसटीने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. यात बाईत यांचे नातेवाईक थोडक्यात बचावले. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून नागोठणे पोलिस ठाण्यात घटनेची नोंद आहे.
भरधाव एसटी बसची रुग्णवाहिकेला धडक

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606