नैना प्रकल्पाला गती

नगर नियोजन क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प, विकास कामांकरिता निविदा

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग प्राप्त होणार असून टीपीएस-2, 3, 4, 5, 6 आणि 7 अंतर्गत प्रस्तावित असणार्‍या रस्ते, पदपथ, पावसाळी पाण्याची गटारे इ. विकास कामांकरिता सिडकोतर्फे निविदा मागविण्यात आल्या असून लवकरच या विकास कामांना प्रारंभ होणार आहे.

हा राज्याच्या नगर नियोजन क्षेत्रातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नगर रचनापरियोजनांद्वारे या प्रकल्पाचा विकास करण्यात येत असल्याने प्रत्येक योजनेची व योजनेंतर्गत विकास कामांचीवेगाने अंमलबजावणी व्हावी याकरिता सिडको प्रयत्नशील आहे. टीपीएस-2, 3, 4, 5, 6 आणि 7 अंतर्गतविकास कामांकरिता निविदा मागविण्यात आल्या असून या योजनांमध्ये समाविष्ट जमिनींवर विकास कामांनालवकरच सुरूवात होणार आहे. तसेच नैना आणि नवीन पनवेल यांना जोडणार्‍या देवद गावाजवळील पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

अंतिम नगर रचना परियोजना क्र. 1 व 2 तसेच प्राथमिक नगर रचना परियोजना क्र. 3 यांनाशासनाची मंजुरी मिळाली आहे. नगर रचना परियोजना क्र. 4, 5, 6 व 7 यांच्या प्रारुप परियोजनांना शासनाची मंजुरी मिळाली असून या परियोजनांच्या पुढील कार्यवाहीसाठी शासनातर्फे लवादाची नियुक्ती झाली आहे.सिडकोतर्फे टीपीएस-2, 3, 4, 5 आणि 6 अंतर्गत टप्पा-1 पर्यंत रस्त्यांचा विकास, पदपथ आणि पावसाळी पाण्याची गटारे इ. तर टीपीएस-7 अंतर्गत टप्पा-1 पर्यंत रस्त्याची सुधारणा, पदपथ आणि पावसाळी पाण्याची गटारे इ. विकास कामांकरिता नुकत्याच निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून त्यानंतर टीपीएस अंतर्गत प्रस्तावित असणारी विकास कामे वेगाने सुरू होणार आहेत.

सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवतलच्या प्रदेशाची होणारी संभाव्य अनिर्बंध वाढ रोखण्यासाठी या प्रदेशातील 371 चौ.कि.मी. क्षेत्रामध्ये नैना हे सुनियोजित आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे शहर विकसित करण्यात येत आहे. नैना प्रकल्पाच्या जलद आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी नैना विकास आराखड्याची अंमलबजावणी 12 नगर रचना परियोजनांद्वारे (टीपीएस) करण्यात येत आहे. ङ्गजमीन मालकांचा सहभागफ या तत्त्वावर नगर रचना परियोजना आधारित आहेत. योजनांमधील पायाभूत सुविधांचा विकास सिडकोतर्फे करण्यात येत आहे.

-डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको


Exit mobile version