रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

। रसायनी । वार्ताहर ।
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रक्तदात्याकडून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लिमये ब्लड बॅक यांच्यावतीने ग्रामपंचायत सदस्य राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले.यावेळी जेष्ठ नागरिक तात्यासाहेब म्हस्कर यांच्याहस्ते शिबिराला सूरुवात करण्यात आली.मान्यवरांच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होवून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.यावेळी रक्तदात्यांची रक्तदाब, रक्तातील शर्करा तपासणी करून नंतर रक्तदान करण्यास पात्र असलेल्या नागरिकांनी रक्तदान केले.रक्तदान केलेल्या नागरिकांना प्रशस्तीपत्र व अल्पोपहार देण्यात आले.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिसरातील तरुणांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी यावेळी सरपंच ताई पवार, राकेश खारकर,सिताराम म्हस्कर, रमेश पाटील, गजानन मांडे, सुरेश म्हात्रे, कृष्णा पारंगे, आहिर, रामचंद्र मुंढे, प्रदीप पाटील, संतोष पांगत, भालचंद्र राऊत,बाळू धांडे,मारुती खाने, पांडुरंग भौड आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version