रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

। उरण । प्रतिनिधी ।

लायन्स क्लब ऑफ पनवेल-द्रोणागिरी-उरण, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, अविनाश म्हात्रे व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला बेरोजगारांसह पालकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

प्रथमच उरण तालुक्यात त्यातही ग्रामीण भागात पहिल्यांदाच बेरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यासाठी 233 उमेदवारांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 82 इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी शिक्षण, अनुभव, कौशल्य बघून एकूण 30 जणांची निवड करण्यात आली आहे. यावेळी लायन्स क्लबचे एम.डी. अध्यक्ष अमरचंद शर्मा, जिल्हाध्यक्ष आर.एन. रामेश्‍वरन, उपाध्यक्ष संजीव सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रविण सरनाईक, विभाग प्रमुख सुयोग पेंडसे, यशस्वी ग्रुपचे एस.जी. चव्हाण, सचिव अशोक मिलडा, प्रोजेक्ट कोओरडीनेटर के.एस. पाटील, उरण अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कोठावदे, द्रोणागिरी अध्यक्ष सागर चौकर, अविनाश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version