| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली शहरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन येथील समर्थ मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या मेळाव्याला 500हून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात बहुसंख्यक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तसेच, नोकर पात्र ठरलेल्या तरुण-तरूणींना नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा शिवानी जंगम, कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम, तालुका चिटणीस किशोर पाटील, जिल्हा नेते रविंद्र रोकडे, माजी नगरसेवक किशोर पानसरे, कैलास गायकवाड, जगन्नाथ ओव्हाळ, कय्यूम पाटील, शहर खजिनदार जयंत पाठक, राजू अभाणी, दिनेश गुरव, संजय पाटील, दिलीप पोरवाल, शांताराम पाटील, प्रसाद पाटिल, भूषण कडव, प्रविण लाले, संतोष पाटील यांच्यासह शेकापक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतुल म्हात्रे म्हणाले की, पेण विधानसभेची निवडणूक लढविताना 5 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस होता. निवडणुकीत यश आले नसले तरी विधानसभा मतदारसंघात नव्हेतर उत्तर रायगड मतदारसंघातील सर्व तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. 16 रोजगार मेळाव्यातून 3 हजार तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शेकाप राजकीय उद्दीष्ट ठेवून काम करीत नाही, असे अतुल म्हात्रे यांनी सांगितले.





