| पनवेल | वार्ताहर |
कार आणि मोटरसायकल अडवून तिघांना मारहाण करून कारच्या काचा फोडून नुकसान केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि.2) गुन्हा दाखल करण्यात आला.
दापोली-पारगाव येथील विश्वजीत म्हात्रे हे बुधवारी (1) मित्रांकडे पार्टीसाठी गेले होते. गुरूवारी पहाटे दीडच्या सुमारास पार्टी संपवुन ते महिंद्रा एक्सयूव्ही गाडीने निघाले. ते खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या अलीकडील चौकाजवळ आले असता त्यांच्या गाडीला पांढऱ्या रंगाची स्विफ्ट आडवी आली. लगेच काळ्या रंगाची कार मागे आडवी लावली. त्यानंतर तीन ते चार मोटरसायकल देखील आडव्या लावण्यात आल्या. त्यावेळी 15 ते 20 जणांनी विश्वजीत म्हात्रे यांच्यासह त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत धमकावले आणि विक्रम उर्फ टिंग्या याने फायबर पाईप आणि पीव्हीसी पाईपने कारच्या काचा फोडल्या. यावेळी चाकू सारख्या टोकदार वस्तूने मारहाण केली. त्यावेळी त्यांची नावे जय, मनीष, संजोग, विकास असल्याचे समजले. मारहाण करून आणि गाडीच्या काचा फोडून ते तेथून निघून गेले.







