| सुकेळी | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील नागोठण्यातील जिंदल कंपनीच्या समुहाअंतर्गत असलेल्या बी.सी. जिंदल रुग्णालयाच्या सौजन्याने व बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या सहकार्याने बुधवारी (दि.11) बाळसई गावामध्ये हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 95 नागरिकांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये जिंदल रुग्णालयातील डॉ. मनिष रायकवार यांच्यातर्फे नागरीकांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये नागरिकांची ईसीजी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून मोफत औषधे देण्यात आली. यावेळी डॉ. मनिष रायकवार, मधुकर ठमके, विठ्ठल म्हसकर, सचिन भोसले, दत्ताराम पाटेकर, प्रदिप ठमके, वसंत भोसले, भिकाजी पवार, हनुमान मुंडे, हरेष ठमके, भालचंद्र जाधव, जिंदल रुग्णालयाचे व्यवस्थापक कमलेश अस्थांना, किरण सुटे, दिनेश ठमके, मोहीनी जांबेकर, अदिती जंगम, शीबा वर्गीस, केतकी पार्टे, मनिष डांगी, रामदुल्हारे, संदिप चाळके, संतोष शिर्के व यशवंत वारगुडे आदी कर्मचारी उपस्थित होते.







