कर्जत येथे रायगड युथ कार्निव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेरळ | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवा सेलच्या माध्यमातून महाराष्ट्र युथ कार्निव्हलचे आयोजन जिल्हास्तरावर केले जात आहे. जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे मानकरी यांची राज्यस्तरीय पातळीवर निवड होणार आहे.रायगड जिल्हास्तरीय युथ कार्निव्हलचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले होते. सिंगिंग,डान्सिंग,पेंटिंग आणि मॉडेलिंग या चार प्रकारात झालेल्या महाराष्ट्र युथ कार्निव्हलमध्ये तरुणांना उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्निव्हल मध्ये डान्सिंग,सिंगिंग,पेंटिंग आणि मॉडेलिंग या प्रकारात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
युवती संघटिका प्रतीक्षा लाड,राष्ट्रवादी विद्यार्थी संघानेचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसाद पाटील,उपाध्यक्ष ऋषिकेश दाभाडे,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सचिव भूषण पेमारे,जिल्हा उपाध्यक्ष वीरेंद्र जाधव,विद्यार्थी संघांटा कर्जत तालुका अध्यक्ष आर्केश काळोखे,खालापूर तालुका अध्यक्ष शुभम सकपाळ,कर्जत तालुका उपाध्यक्ष तुषार देशमुख,कर्जत शहर अध्यक्ष झहीर खान आदीच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली.
तर जिल्हास्तरीय महाराष्ट्र युथ कार्निवल चा समारोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड,कोकण संघटक किरण शिखरे,कर्जतच्या माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड,माजी नगराध्यक्ष शरद लाड,माजी उपनगराध्यक्ष उमेश गायकवाड,नगरसेवक सोमनाथ ठोंबरे,अल्कपसंख्यक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष नोमान नजे,अजिंक्य भोईर,कल्पना पोटे,नीरा विचारे,रमेश खांडेकर आदी उपस्थित होते. यांच्यासह कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य व्ही पिल्लेवान हे स्पर्धेतील तरुणांना प्रोत्साहन द्यायला हजर होते. स्पर्धेसाठी योगिता महाजन यांनी सिंगिंग स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पहिले,तर मॉडेलिंग स्पर्धेचे परीक्षण वैष्णवी शाह यांनी केले.सुरज बनकर यांनी डान्स स्पर्धेचे परीक्षक म्हणून आणि अक्षय शिंदे यांनी पेंटिंग स्पर्धेचे परीक्षण केले.

कार्निव्हलमधील विजेते
महाराष्ट्र युथ कार्निव्हल मधील सिंगिंग मध्ये तेजस महाडिक हा प्रथम तर रुपेश देशमुख हा दुसर्‍या आणि भावेश ठाकरे हा तिसर्‍या क्रमांकावर राहिला.मॉडेलिंग प्रकारात विशाल रोकडे याने प्रथम तर प्रणब ने दुसरा आणि उत्कर्षा विसावे तिसरी तसेच चौथा क्रमांक शिवतेज ठाकरे यास देण्यात आला.

Exit mobile version