निजामपूर येथे क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संकुल स्तरीय टेबल टेनिस स्पर्धांचे तसेच विविध विषयांवरील प्रदर्शन कार्यक्रमास प्रतिसाद लाभला. यावेळी तुकाराम सुतार, नितीन बडे, डॉ.संजय खोब्रागडे, रुपाली खडतर, डॉ.विनोद कदम, एम.एन.बरुळे, राजेश धबाल, पराग अकोलेकर उपस्थित होते. प्राचार्य के.वाय.इंगळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संपन्न झालेल्या विविध विषयांच्या प्रदर्शनात पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.

विज्ञान प्रदर्शन प्रथम क्रमांक सर्वेश देशमुख (ज.न.वि. रायगड), द्वितीय पियुष पवार (ज.न.वि. अहमदनगर), द्वितीय ऋषीकेश भुजबळ (ज.न.वि. पुणे), तृतीय सुशांत होळकर (ज.न.वि. लातूर), गणित प्रदर्शन प्रथम साहिल कोकरे (ज.न.वि. रायगड), द्वितीय नंदिनी महाजन (ज.न.वि. लातूर), तृतीय सानिका ससाणे (ज.न.वि. बीड). माहिती तंत्रज्ञान प्रदर्शन प्रथम सृष्टी चिंचकर (ज.न.वि. रायगड), द्वितीय मानसी मुरकूटे (ज.न.वि. उस्मानाबाद), तृतीय मयूर राठोड (ज.न.वि. बीड), समाजशास्त्र प्रदर्शन प्रथम काशाब शेख (ज.न.वि. रायगड), द्वितीय चैतन्य पालवे (ज.न.वि. रायगड), तृतीय बालाजी घारगिल (ज.न.वि. पुणे), समाजोपयोगी उत्पादक कार्य प्रदर्शन प्रथम कृष्णा ढवळे (ज.न.वि. पुणे), द्वितीय राम शिंदे (ज.न.वि. बीड), तृतीय सुयश राऊत (ज.न.वि. सोलापूर) याशिवाय टेबल टेनिस क्रीडा प्रकारातील तीन गटात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे याप्रमाणे:- वयोगट 14 वर्षे मुली प्रथम समृध्दी कलकुटे (ज.न.वि. बीड), द्वितीय श्रृती काळे (ज.न.वि. रायगड), तृतीय रितीका फापळ (ज.न.वि. बीड). वयोगट 14 वर्षे मुले प्रथम अथर्व घुले (ज.न.वि. उस्मानाबाद), द्वितीय रामकृष्ण पांडे (ज.न.वि. बीड), तृतीय- मनोमय गायकवाड (ज.न.वि. रायगड), वयोगट 17 वर्षे मुली प्रथम आरती बनसोडे (ज.न.वि. बीड), द्वितीय प्रांजली पाटोळे (ज.न.वि. रायगड), तृतीय संजना चौगुले (ज.न.वि. उस्मानाबाद). वयोगट 17 वर्षे मुले प्रथम आदर्श मसुटे (ज.न.वि. सोलापूर), द्वितीय पियुष कोरडे (ज.न.वि. रायगड), तृतीय ऋषी कांदे (ज.न.वि. बीड). वयोगट 19 वर्षे मुली प्रथम साक्षी पाटील (ज.न.वि. रायगड), द्वितीय- विदिशा गोटे (ज.न.वि. रायगड), तृतीय सहेली दिवेकर (ज.न.वि. रायगड). वयोगट 19 वर्षे मुले प्रथम अथर्व जठारी (ज.न.वि. रायगड), द्वितीय सचिन म्हात्रे (ज.न.वि. रायगड), तृतीय प्रतिक शिंदे (ज.न.वि. रायगड) यांना मिळाले.

सूत्रसंचालन केदार केंद्रेकर यांनी केले तर आभार विद्यालयाच्या वतीने उपप्राचार्य शिरीष जाधव यांनी मानले.

Exit mobile version