गेल कर्मचारी, कुटूंबियांसाठी क्रीडा स्पर्धा

| अलिबाग । प्रतिनिधी ।

सतत कामात व्यस्त असणारे अलिबाग तालुक्यातील गेल कंपनीच्या कर्मचार्‍यांसाठी रविवारी (दि.18) रोजी वरसोली समुद्रकिनारी सकाळपासून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये क्रिकेट, धावणे, लगोरी, सारखे सांघिक व वैयक्तीत खेळ घेण्यात आले. या खेळामध्ये कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

गेल कंपनीचे मुख्य महाप्रबंधक अनुप गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विरेंदर कुमार, महाप्रबंधक प्रवीण लोखंडे, मुख्य प्रबंधक शितल लकरा आदी अधिकार्‍यांसह वेगवेगअळया विभागातील प्रमुख, कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते. सकाळी सात ते अकरा यावेळेत झालेल्या स्पर्धेतील अंतिम विजेत्यांना आकर्षक चषक व बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version