| कर्जत | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद उपकर निधी अंतर्गत कर्जत पंचायत समितीच्या वतीने गुणवत्ता संवर्धन कार्यक्रम 2025-26 अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कला – क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या यशवी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात क्रीडा-कला महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. 3 हजार दोनशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. 104 पारितोषिके या विद्यार्थ्यांनी मिळविली आहेत.
पंचायत समिती सभापती नमिता घारे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. याप्रसंगी नारायण डामसे, चित्रा ठाकरे, बाबू घारे, सुवर्णा ठाकरे, सुनीता मोरे, वर्षा दोरे, उषा ठोंबरे, नितीन धुळे, अक्षय तिटकरे, नमिता श्रीखंडे, कविता पादीर, रेश्मा जोशी, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, गट शिक्षणाधिकारी अनंत खैरे, चंद्रशेखर जुईकर, अरुण पारधी, प्रदीप सुर्वे, देविदास जाधव, नारायण सोनावणे, बिभीषण नवले, किशोर पाटील, महेश खाडे, नितीन थळे, उज्वला मोरे, माधुरी पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन पद्माकर म्हात्रे यांनी केले.




