| आंबेत | वार्ताहर |
मुसळधार पावसात आपण नद्या, नाले, तसेच डोंगर माथ्यावर कोसळणारे पाणी वाहताना अनेक वेळा पाहतो. मात्र घरातून झरे वाहताना कधी ऐकल नाही, मात्र म्हसळा तालुक्यातील देवघर कोंड गावात चक्क घरातूनच झरे वाहू लागले आहेत. म्हसळा शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर वसलेलं हे छोटंसं उंच डोंगर माथ्यावरील गाव, दरडप्रवन क्षेत्र म्हणून देखील हे गाव चर्चेत आहे, मात्र या गावाला आता डोंगर माथ्यावरील कोसळणारे पाण्याने घरामधूनच पायवाट शोधत आपला प्रवाह केला आहे. या गावात राहणाऱ्या कल्याणी चंद्रकांत काप, महेंद्र काप, दीपेश चौकेकर, सचिन काप, भारती काप, धोंडू शिंदे आणि महिला बचत गटाच्या सभागृहमधून हे झरे वाहत आहेत. त्यामुळे गावात भिती निर्माण झाली आहे. एकीकडे डोंगराळ भाग आणि दुसरीकडे कोसळणारे पावसाचे पाणी हे थेट घरातूनच पाणी येत असल्यामुळे भविष्यात ही घरे कमकुवत होऊ शकतात, त्यामुळे प्रशासन देखील या नैसर्गिक आपत्तीला हतबल झाले आहे.
देवघरकोंड हे गाव तालुक्यात उंचीवर असून डोंगरावरून येणारे पाणी हे थेट घरांच्या खालच्या बाजूला झिरपत असून गावात अनेक नागरिकांच्या घरांमधून झरे वाहण्यासारखे प्रकार समोर येत आहेत त्यामुळे गावकऱ्यांमध्ये साहजिकच भीती निर्माण होते मात्र पाऊस कमी झाला की हे झरे देखील कमी प्रमाणात वाहतात.
जितू गिजे
सामाजिक कार्यकर्ते