| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
श्रीलंका संघ सध्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातला पहिला वनडे सामना हा मंगळवारी पार पडला होता. या सामन्यात पाकिस्तानने सहा बळी घेत सामना जिंकला होता. यानंतर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने श्रीलंकन संघ प्रचंड घाबरलेला आहे आणि संघातील 8 खेळाडूंनी स्पर्धा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला त्यांची नाचक्की झाली आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या वनडे मालिका सूरू असताना इस्लामाबदमध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाली होती. या हल्ल्यानंतर श्रीलंकन संघात एकच घाबरगुंडी उडाली आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील आठ खेळाडू गुरुवारी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेचा मायदेशी परतण्याचा निर्णय
