पोयनाड । वार्ताहर ।
झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या 60 व्या वर्धनपनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या झुंझार पोयनाड प्रीमिअर लिग क्रिकेट स्पर्धेत श्री स्वामी समर्थ ओमसाई फार्महाऊस संघ अंतिम विजयी ठरला आहे ,अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पोयनाड सुपर जायंट्स संघाला पराभूत करत श्री स्वामी समर्थ – ओमसाई फार्महाऊस संघाने प्रथम क्रमांकाच्या चषकावर आपलं नाव कोरले. झुंझार पोयनाड प्रीमिअर लिग स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री स्वामी समर्थ ओमसाई फार्महाऊस संघ अंतिम तर पोयनाड सुपर जायंट्स व्दितीय क्रमांक, जय मल्हार 11 पोयनाड तृतीय क्रमांक पटकाविला या बेस्ट बॅट्समन विशाल निषाद, बेस्ट बॉलर परेश चवरकर, बेस्ट फिल्डर ऋतिक जाधव विशाल निषाद मॅन ऑफ दि सिरीज देण्यात आली. यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि नुकतेच नेल्सन मंडेला नोबेल पिस फाउंडेशन आणि सेंट मदर टेरेसा इन्स्टिट्यूट द्वारे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल मानद डॉक्टरेट मिळालेल्या चित्रा आस्वाद पाटील,चंद्रशेखर बोईर,राहुल अत्तिग्रे, महादेव जाधव, श्री.काळे, किशोर जैन, अजित चवरकर,डॉ. मोनाली चवरकर, महेंद्र पाटील, शैलेश पाटील, महेंद्र वाडेकर, शैलेंद्र भगत,अन्वर बुराण,सचिव किशोर तावडे, दिपक साळवी, अजय टेमकर, योगेश चवरकर, नंदकिशोर चवरकर, सुजित साळवी,संतोष चवरकर, परेश चवरकर, जय पाटील, पंकज चवरकर, इम्रान बुराण,संदिप जोशी,अँड पंकज पंडित,संकेश ढोले, आदेश नाईक सह पोयनाड गावातील प्रतिष्टीत व्यापारी,माजी खेळाडू, सभासद, हितचिंतक आणि क्रिकेट प्रेमी लोकं मोठ्या संख्येने उपस्थित होते.