चालकाला फिट आल्याने एसटी बसची पाच वाहनांना धडक

। चंद्रपूर । वार्ताहर ।

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात एसटी बसचालकाला फिट आल्याने बसवरील नियंत्रण सुटलेल्या बसने पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेतील एसटी महामंडळाची बस ब्रम्हपुरीहून चंद्रपूरला प्रवाशांना घेऊन जात असताना बस चालकाला अचानक फिट आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने दोन दुचाकी, दोन चारचाकी व एक ट्रॅक्टर अशा पाच वाहनांना धडक देत नागपूर महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळच्या गॅरेजमध्ये शिरली. या धडकेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून गॅरेजचेही नुकसान झाले आहे. तसेच, या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले असून सात प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Exit mobile version